ओडिशातील वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरकडून महिला रूग्णांवर बलात्कार

14 Aug 2024 20:58:04

SCB College Odisha Rape
 
भुवनेश्वर : ओडिशातील कटक येथील एसबीसी वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयात दोन रूग्णांवर डॉक्टरांनी बलात्कार केला असल्याची माहिती उघडकीस आली आहे. तपासणीसाठी आलेल्या रूग्णांवर वरिष्ठ डॉक्टरांनी बलात्कार केला. ही घटना ११ ऑगस्ट रोजी घडली आहे. याप्रकरणी कटकच्या मंगलबाग पोलिसांनी वरिष्ठ डॉक्टरांना अटक केली. यावेळी रूग्णांच्या कुटुंबियांनी डॉक्टरला बेदम मारहाण केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे बलात्कार झालेल्या पीडित महिला रूग्णाचे नातेवाईक त्याच महाविद्यालयात शिक्षण घेत होता. दिलबाग सिंह ठाकूर असे आरोपी डॉक्टरचे नाव असून तो भोपाळ येथील रहिवासी आहे.
 
संबंधित डॉक्टर हा हृदयरोगावर उपचार करतो. पीडित रूग्णांच्या तपासणीसाठी आरोपी डॉक्टरने शुक्रवारी होणाऱ्या तपासणीची वेळ पुढे ढकलली आणि तपासणीसाठी रविवारी येण्यास सांगितले. याप्रकरणाची माहिती कटक पोलिसांनी दिली असून कटक पोलीस अनिल मिश्रा म्हणाले, तपासणीसाठी शुक्रवारी न बोलवता रूग्णांना रविवारी येण्यास सांगितले. तपासणी वेळी घटनास्थळी नर्स असणे अपेक्षित होते. त्यादिवशी वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या नातेवाईक विद्यार्थींनीला आत जावू दिले गेले नाही. यावेळी डॉक्टरांनी पीडित रूग्णांवर बलात्कार केला.
 
11 ऑगस्ट रोजी मंगलबाग पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत लैंगिक छळाचे आरोप करण्यात आले होते, त्याआधारे पोलिसांनी तपास सुरू केला होता. भारतीय न्यायिक संहितेच्या कलम ६२ (२) (ई) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलिसांनी पीडित रूग्णांची याआधीच तक्रार नोंदवून घेतली होती. पीडित रूग्णांच्या कुटुंबियांनी आरोपीवर हल्ला केला आणि बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर कटक पोलिसांनी आरोपी डॉक्टरांना ताब्यात घेतले.
 
याप्रकरणी कटक पोलिसांनी सांगितले की, “आम्ही मंगळवारी (१३ ऑगस्ट २०२४) गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मूग गिळून गप्प बसले आहे. ओडिशाच्या आरोग्य विभागाने 3 सदस्यीय समिती स्थापन केली आहे, जी सरकारला याप्रकरणाचा तपास अहवाल सादर करेल.
 
 
Powered By Sangraha 9.0