"काळजी करू नका! जो मराठ्यांच्या विरोधात येईल त्याचा..."; जरांगेंचा भुजबळांना इशारा

14 Aug 2024 12:04:12
 
Jarange & Bhujbal
 
नाशिक : काळजी करू नका, छगन भुजबळांचा करेक्ट कार्यक्रम करणार, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे. नाशिकमध्ये मनोज जरांगेंची शांतता रॅली आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळांवर निशाणा साधला.
 
मनोज जरांगे म्हणाले की, "छगन भुजबळ म्हणतात की, २८८ जागा निवडून दाखवा. पण छगन भुजबळांनी सगळी शिवसेना मोडून टाकली, राष्ट्रवादीही मोडली आणि आता देवेंद्र फडणवीसांच्या भाजपचा नंबर आहे. तरीही यांच्या नादी लागू नये, हे त्यांच्या लक्षात येत नाही."
 
हे वाचलंत का? -  सुप्रिया सुळेंचे व्हॉट्सॲप हॅक! हॅकरकडून तब्बल 'इतक्या' डॉलरची मागणी
 
"तुमच्या येवल्याचं नाव यावेळी पवित्र होणार आहे. येवल्याला लागलेला डाग धुतला म्हणून समजा. तुम्ही काळजी करू नका, त्यांचा कार्यक्रमच करतो. जो जो मराठ्यांच्या विरोधात येईल त्याचा कार्यक्रम झालाच म्हणून समजा. मग तो महाराष्ट्रातला कुणीही असू द्या," असा इशारा जरांगेंनी दिला आहे.
 
मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षण द्या, अशी जरांगेंची मागणी आहे. तसेच येत्या २९ तारखेला विधानसभा निवडणूकीत मराठा उमेदवार उभे करायचे की, नाही याबाबत मनोज जरांगे निर्णय घेणार आहेत. दरम्यान, छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमधून जरांगेंनी भुजबळांना इशारा दिला आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0