बांगलादेश हिंसाचाराची पश्चिम बंगालमध्ये पुनरावृत्ती!

13 Aug 2024 18:51:34
 
Paschim Bangal
 
कोलकाता (Jay Shree Ram) : 'सलाम वालेकूम'ला 'जय श्री राम'ने (Jay Shree Ram) उत्तर देत अभिवादन केले, म्हणून कट्टरपंथी युवकांनी हिंदू कुटूंबियांच्या घरात घुसून मारहाण करत देवघरातील मूर्त्यांची तोडफोड केली. पश्चिम बंगालच्या नमिता पाईकमारा या भागात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
 
पश्चिम बंगाल भाजपने ट्विट करत एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओत घरावर केलेला हल्ला दिसत आहे. तसेच व्हिडिओमध्ये पीडित व्यक्ती आपले दुख सांगत आहे. हा व्हिडिओ बांगलादेश भाजपने शेअर केल्यानंतर त्यांनी लिहिले की, निमता पाइकपारा येथील वॉर्ड क्रामांक ५ येथील निवासी बिस्वजीत यांच्या घरी १५०-२०० कट्टरपंथींनी घरात घुसखोरी करत घराची तोडफोड केली आहे. त्यावेळी त्यांचे सामानही तोडण्यात आले असून घरातील देव-देवतांच्या मुर्त्या तोडण्यात आल्या.
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री पीडित कुटूंबियांवर हल्ला झाला त्यावेळी घरात घुसून घरातील लोकांना मारहाण केली. त्यावेळी कुटुंबातील महिलेने हात पाय पकडून सोडवण्यासाठी विनंती केली. मात्र हल्लेखोरांनी महिलेच्या शरिरावरील भागांवर स्पर्श करण्यात आला होता. लवकरात लवकर जागा खाली करा नाहीतर आम्ही पुन्हा येऊ अशी धमकी देण्यात आली होती.
 
सांगण्यात येत आहे की, बंगालमध्ये हिंदूंच्या घरात ज्याप्रकारे हल्ले होत होते. तिच परिस्थिती बांगलादेशातील हिंदूंवर होती. कट्टरपंथी जमाव घोळक्याने हिंदूंवर हल्ले करत होता. मंदिरे, मुर्त्या तोडण्यात आल्या. लुटमार करण्यात आली होती. अपहरण करण्यात आले होते.
 
Powered By Sangraha 9.0