श्रावण महिन्यात हिंदू विद्यार्थ्यांच्या भोजनात मुद्दामहून मांसाहार देण्याचा प्रयत्न

13 Aug 2024 20:35:22
 

iqbal mohammad
 
लखनऊ (Mohammed Iqbal) : श्रावण महिना हा हिंदूंसाठी पवित्र मानला जातो. मात्र, या श्रावण महिन्यात उत्तर प्रदेशातील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या जेवनात मांसाहार देण्याचा प्रयत्न मुख्यध्यापक मोहम्मद इकबाल यांनी केला आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ येथील प्राथमिक शिक्षण संस्थेत दुपारी जेवनाच्या सुट्टीवेळी इकबाल यांनी हे कृत्य केले आहे.
 
इकबाल यांनी दोन हिंदू विद्यार्थ्यांना मांस दिल्याचा गंभीर आरोप आहे. एका विद्यार्थ्याने मांस खाण्यास विरोध केला होता. मात्र त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता असा आरोप इकबाल यांच्यावर करण्यात आला आहे. तसेच एका अपंग मुलालाही मांस खाण्यासाठी दबाव आणण्यात आला होता. मुख्यध्यापक इकबाल यांनी याआधीही विद्यार्थ्यांवर असाच दबाव टाकला होता.
 
काही विद्यार्थिनींना त्यांच्या घरी मांस खायला सांगितले होते यावरून त्यांच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. कुटुंबिय प्रथम स्थानिक नगरसेवकासह वैद्य वाडा येथील प्राथमिक शाळा येथे पोहोचले. त्यांनी कोतवाली येथे पोलीस ठाण्यात जाऊन मुख्यध्यापक इकबाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
 
 
 
दरम्य़ान याप्रकरणी मुख्यध्यापक इकबाल यांना निलंबित करण्यात आले आहे. अशातच इकबाल यांनी श्रावण महिन्यात मांस खाऊ घातले या मुद्द्यावरून शाळेतील शिक्षिका चौधरी यांनी हा मुद्दा गांभीर्याने घेतला. त्यांनी याप्रकरणी गट शिक्षणाधिकाऱ्यांना तपासणीसाठी पाठवले होते. त्यात पाच विद्यार्थ्यांनी मांसाहार केले असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एका हिंदू अपंग विद्यार्थ्याला मांस खाऊ घालण्यात आले. त्यामुळे मोहम्मद इकबाल यांना निलंबित करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
हे प्रकरण गंभीर असल्याने त्यांना अटक करण्यात आली. इकबाल यांच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या मुसक्या आवळल्या गेल्या असून आरोपीची सध्या पोलीस चौकशी सुरू आहे.
 
Powered By Sangraha 9.0