जोगेश्वरीत सरकारी जमिनीवर 'लॅण्ड जिहाद'?

13 Aug 2024 13:20:03

Jogeshwari Land Jihad

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Jogeshwari Land Jihad News) जोगेश्वरीतील इस्माईल युसुफ कॉलेजच्या जागेवर वक्फ बोर्डाने दावा केल्याचा एक व्हिडिओ नुकताच निदर्शनास आला आहे. यात दोन इस्लामिक कट्टरपंथी सरकारी कर्मचाऱ्याशी वाद घालत असून जागा वक्फ बोर्डाच्या अखत्यारीत असल्याचे ते म्हणत आहेत. सदर जागा आपल्या पूर्वजांची असल्याचा दावा त्यांच्याकडून होताना दिसत आहे. इतकच नव्हे तर काम न थांबल्यास दहा हजारांच्या जमावास पुढे सामोरे जावे लागेल असा धमकीवजा इशाराही तेथील काहींनी दिल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते आहे.

हे वाचलंत का? : म्हणे हिंदू समाजावर ‘सूडहल्ले’; ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने तोडले तारे!



व्हायरल व्हिडिओनुसार जोगेश्वरीत या सरकारी जमिनीवर पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरु होते. त्याला हे कट्टरपंथी विरोध करताना दिसत आहेत. "यह वक्फ कीं जमीन है, कलेक्टर के बाप की जगह नहीं है", असे म्हणत सरकारी कर्मचाऱ्यास धमकवले जात आहे. वक्फच्या जमिनीवर वर्क ऑर्डर कशी आणू शकतात? असा सवाल उपस्थितांकडून केला जात आहे. जोगेश्वरीतील या व्हिडिओमुळे मुंबईतील वाढत्या लॅण्ड जिहादचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले. सरकार अशा लॅण्ड जिहादच्या घटनांवर काय पाऊल उचलणार हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल.

Powered By Sangraha 9.0