हिंडेनबर्गचा गुंतवणूकदारांवर काहीच परिणाम नाही! सेन्सेक्स 80 हजारांवर!

12 Aug 2024 15:53:27
hindenburg research indian market


मुंबई :          अमेरिकन गुंतवणूक संशोधन संस्था हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी ग्रुपवर ठपका ठेवल्यानंतर शनिवारी दि. १० ऑगस्ट २०२४ रोजी सेबी अध्यक्षा माधबी पुरी-बुच आणि त्यांच्या पतीवर अदानी समूहाशी संबंधित ऑफशोअर फंडांमध्ये हिस्सा असल्याचा नवीन आरोप केला. या आरोपानंतर भारतीय भांडवली बाजारात पुन्हा एकदा भीतीचे सावट निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. परंतु, सोमवारी पहिल्या सत्रातील घसरणीनंतर बाजारावर फारसा नकारात्मक परिणाम दिसला नाही.

दरम्यान, सोमवारच्या पहिल्या सत्रात बाजारात किंचित घसरण झाली होती. बाजार बंद होताना सेन्सेक्स ५६.९९ अंशांनी घसरून ७९६४८.९२ वर स्थिरावला तर निफ्टी ५० २०.५ अंशांच्या घसरणीसह २४३४७ वर स्थिरावला आहे. तसेच, अदानी समूहातील विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाल्यानंतर पुन्हा वधारल्याचे पाहायला मिळाले. हिंडेनबर्गने केलेल्या आरोपांचा भारतीय भांडवली बाजारावर कोणताही नकारात्मक परिणाम दिसून आलेला नाही.

हिंडेनबर्ग रिसर्चने जाहीर केलेल्या अहवालात सेबी प्रमुख माधबी पुरी-बुच आणि त्यांचे पती यांचा अदानी समूहाच्या ऑफशोर फंडात मनी गैरव्यवहाराच्या कथित घोटाळ्यात वापरल्या गेलेल्या 'परकीय निधी'मध्ये भागीदारी असल्याचा आरोप केला होता. या आरोपांबाबत सेबी प्रमुख बुच आणि त्यांचे पती यांनी संयुक्त निवेदन जारी करून हिंडेनबर्गचे आरोप फेटाळून लावत आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले आहे.


Powered By Sangraha 9.0