अमान सहरावतला 'तारक मेहता...' आवडतं; जेठालाल झाले खुश आणि...

12 Aug 2024 15:43:01

dilip joshi  
 
 
 
मुंबई : पॅरिस ऑल्पिम्पिक २०२४ मध्ये भारताला कांस्य पदक मिळवून देणाऱ्या अमान सहरावत याचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. नुकतंच अमानला लोकप्रिय कार्यक्रम तारक मेहता का उल्टा चष्मा हा शो आवडत असल्याचे समजले आहे. २००८ पासून हा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. यातील जेठालाल हे पात्र सगळ्यांच्याच विशेष आवडीचं आहे. दरम्यान, अमानच्या या आवडीबद्दल जेठालाल अर्थात अभिनेते दिलीप जोशी यांना आनंद झाला असून त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
 
अमन सेहरावतला मोकळ्या वेळेत काय करतो असे विचारले असता तो म्हणाला की, “फावल्या वेळेत तो तारक मेहता का उल्टा चष्मा हा सो आवडीने पाहतो., "मला तारक मेहता का उल्टा चष्मा बघायला फार आवडतं." हे अमन सेहरावतचे हे उत्तर ऐकून शोमध्ये जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशीही खूश झाले आहेत.
 

dilip joshi  
 
इंस्टाग्राम स्टोरीवर अमनचा व्हिडिओ शेअर करत दिलीप जोशी यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, "धन्यवाद अमन सेहरावत. आम्ही तुमचे मनोरंजन करत राहू. आपल्या देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केल्याबद्दल तुमचे आणि आपल्या इतर सर्व ऑलिम्पियन्सचे अभिनंदन."
Powered By Sangraha 9.0