पूजा खेडकरप्रकरणी उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!

12 Aug 2024 13:33:31
 
Pooja Khedkar
 
नवी दिल्ली : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणी उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. पूजा खेडकरला तात्काळ अटक करण्याची गरज नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.
 
पूजा खेडकर यांनी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, कोर्टाने जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे त्यांना कधीही अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानंतर त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला.
 
हे वाचलंत का? -  भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यपदी अनुप मोरे यांची नियूक्ती!
 
सोमवारी यावर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. दरम्यान, न्यायालयाने पूजा खेडकर यांना २१ तारखेपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सध्या त्यांची चौकशी सुरु असून त्यांना तात्काळ अटक करण्याची गरज नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे पूजा खेडकरसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0