"मनोज जरांगेंची भाषा राजकीय नेत्याचीच!"

12 Aug 2024 11:44:36
 
Jarange
 
मुंबई : आज मनोज जरांगेंची भाषा ही राजकीय नेत्याचीच बनली आहे, अशी टीका भाजप नेते नितेश राणेंनी केली आहे. तसेच जर राजकीय भाषा बोलायची असल्यास त्यांना राजकीय उत्तर मिळेल, असा इशाराही त्यांनी दिला. त्यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली.
 
नितेश राणे म्हणाले की, "दोन दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटलांना मी मोहम्मद अली जिन्नाची उपमा दिल्यामुळे त्यांना आणि महाविकास आघाडीतील लोकांना फार झोंबलं. पण ही उपमा देण्यासाठीही अनेक कारणं आहेत. आमचा मराठा समाजाला पाठिंबा आहे, ही एकच गोष्ट आम्ही पहिल्या दिवसापासून बोलत आहोत. पण आज जरांगे पाटलांची भाषा एका राजकीय नेत्याचीच आहे. ते कधीही महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करत नाहीत तर, फक्त भाजपवर आणि देवेंद्र फडणवीसांवरच टीका करतात. त्यामुळे जरांगेंना जर राजकीय भाषा बोलायची असल्यास त्यांना राजकीय उत्तर मिळेल आणि समाजाबद्दल बोलत असतील तर त्यांना बिनशर्त पाठींबा मिळेल," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "मोहम्मद अली जिन्नाने हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडली, तिच भूमिका जर जरांगे पाटील घेत असतील तर याला आमचा विरोध आहे. मराठा समाजासाठी सुरु केलेल्या आंदोलनात मराठा समाजाचाच फायदा व्हायला हवा," असेही ते म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0