मुंबई (Freindship Day) : अपंग मैत्री ह्या दिव्यांग बंधू-भगिनीच्या संस्थेच्यावतीने आम्हाला मदत नको सहकार्य करा अशी साद घातली गेली. त्याला प्रतिसाद देत भाजपा कोकण विकास आघाडी मुंबई अध्यक्ष सुहास आडिवरेकर साहेब यांनी पाच हजार राख्यांची ऑर्डर अपंग मैत्री या संस्थेच्या सदस्यांना दिली. "अपंग मैत्री" या संस्थेच्या दिव्यांग बंधू-भगिनींनी बनविलेल्या राख्यांचे आज रविवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी मोफत वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन कोकण विकास आघाडी मुंबई सचिव ॲड. प्रिया परब-लाड यांनी केले होते.
अपंग मैत्री चे सदस्य पदाधिकारी विकास हळदनकर, रेश्मा दळवी मेहता आणि मा केतन पांचाळ यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
यावेळी भाजपा कोकण विकास आघाडी जिल्हाध्यक्ष मा श्री राजेंद्र जी कुडतरकर, विधानसभा उपाध्यक्ष वसंतराव साळवी, मा श्री बाळाजी कलांगण, मा अशोक जी नवले, कविता रेगे मॅडम, छाया हळये मॅडम, लक्ष्मी चारी मॅडम, मीना लाड मॅडम, प्रमिला कडेचकर मॅडम, तसेच भाजपा कोकण विकास आघाडी मुंबई सचिव मा श्री गणेश दिवेकर, विधानसभा अध्यक्ष सुप्रिया चव्हाण मॅडम, विधानसभा महामंत्री ममता परब मॅडम, वॉर्ड अध्यक्ष मा श्री शैलेश माने, शिवसेना पदाधिकारी विशाल धुरी, समृद्धी माने मॅडम, वर्षा निवाते मॅडम, सुवर्णा भोसले मॅडम विभागातील प्रतिष्ठित नागरिक मा श्री काशीराम घाडी आणि शालिनी पाटील मॅडम इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद आणि प्रोत्साहन देत दिव्यांग बंधू-भगिनींची प्रशंसा केली.