भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यपदी अनुप मोरे यांची नियूक्ती!

12 Aug 2024 13:14:42
 
Anup More
 
मुंबई : भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी अनुप मोरे यांची नियूक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी रविवारी त्यांची नियूक्ती केली. तसेच राहुल लोणीकर यांना महाराष्ट्र प्रदेश सचिवदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
हे वाचलंत का? -  मराठा आरक्षणावर शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
 
अनुप मोरे हे मूळचे पिंपरी चिंचवड येथील असून यापूर्वी ते प्रदेश सरचिटणीस पदावर कार्यरत होते. दरम्यान, त्यांनी अनेक सामाजिक आणि विद्यार्थी आंदोलने केली आहेत. भाजयुमोचे प्रदेश प्रभारी विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत यापूर्वीचे युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्याकडून मोरे यांनी युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. अनुप मोरे हे गेली २२ वर्षे भारतीय जनता युवा मोर्चाचे काम करीत आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात त्यांनी वॉर्ड अध्यक्षापासून आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात केली.
 
 
 
Powered By Sangraha 9.0