दादर स्थानकातील नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये आढळला मृतदेह

10 Aug 2024 19:10:22
Nandigram Express news


मुंबई :
सुटकेसमधून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास निघालेल्या दोन आरोपांना दादर स्थानकातून अटक केल्यानंतर आता पुन्हा धक्कादायक बातमी समोर येत आहे. नंदीग्राम एक्सप्रेस दि. ९ ऑगस्ट रोजी दादर स्थानकात आल्यानंतर एकच खळबळ उडाली. कारण या एक्सप्रेसच्या शौचालयात एका प्रवाशाचा मृतदेह आढळला. या प्रवाशाने आत्यहत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून ही या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.
 
नंदीग्राम एक्सप्रेस दादर रेल्वे स्थानकात आल्यावर शौचालयात ५० वर्षीय व्यक्तीने गळफास घेतल्याचे आढळले. ज्यानंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यानंतर प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला यासंदर्भात सूचना दिल्या. रेल्वे प्रशासनाने शौचालयातून मृतदेह खाली उतरवून रुग्णालयात नेला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती परभणी जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आले आहे. मात्र ही व्यक्ती सध्या असल्फा परिसरात वास्तव्यास होता. काही दिवसापूर्वी या व्यक्तीविरोधात घाटकोपर पोलिस ठाण्यात छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तो फरार झाला होता, अशी माहिती समोर येतेय.
Powered By Sangraha 9.0