बेस्ट उपक्रमाविषयी प्रदर्शनाचा उद्या अखेरचा दिवस!

10 Aug 2024 18:53:51
BEST Bus news
मुंबई : बेस्ट उपक्रमाअंतर्गत ७७व्या बेस्ट दिनाचे औचित्य साधून ' बेस्ट उपक्रमाचा इतिहास व उपक्रमाची प्रगतीशील कार्यप्रणाली ' याबाबतची सखोल माहिती दर्शविनारे प्रदर्शन दिनांक ७ ऑगस्ट २०२४ ते ११ ऑगस्ट २०२४ पर्यंत सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. या प्रदर्शनात बेस्ट बसची प्रतिकृती, दुर्मिळ जुनी तिकिटे, तिकिट वितरण यंत्रे,कर्मचाऱ्यांचे पोशाख, बॅच,दुर्मिळ पंखे मुंबईकरांना पाहता येणार आहेत.
बेस्टच्या आणिक आगारातील बेस्ट संग्रहालय येथे आयोजित करण्यात आलेला हा प्रदर्शनाचा कार्यक्रम दि. ९ ऑगस्ट रोजी संपणार होता. मात्र कार्यालयीन कामाचे दिवस तसेच शालेय मुलांच्या परीक्षा यामुळे बऱ्याच मुंबईकरांना त्याचा आनंद घेता आला नाही. लोकांचा वाढता प्रतिसाद आणि त्यांची मागणी लक्षात घेता, बेस्ट उपक्रमाने या प्रदर्शनाची कालमर्यादा आज सायंकाळी ६ पर्यंत वाढवली आहे. तरी सर्व मुंबईकरांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे बेस्ट उपक्रमाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0