भर कार्यक्रमातून आव्हाडांनी ठोकली धूम! वाचा काय घडलं?

01 Aug 2024 19:36:12
jitendra awhad


मुंबई :        ”हे व्यासपिठ काय राजकीय होत का? मागास समाजाच्या महापुरूषांबद्दल तुम्हाला तिरस्कार वाटतो म्हणूनच मागे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला आणि आज अण्णाभाऊ साठेंच्या जयंती आनंदाच्या दिवशी तुम्ही काळा शर्ट घालून मुद्दाम आलात. तुम्हाला मातंग समाजाचा मानाचा फेटा घालायलाही नकार दिलात. मात्र मुसलमांनाची गोल टोपी आवर्जून घालता” असे म्हणत लोकांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. तेव्हा हात जोडत जितेंद्र आव्हाड पळूनच गेले.

चेंबुर सुमन नगर येथे दरवर्षी अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त मोठा कार्यक्रम असतो. सर्वपक्षिय नेते , समाजकारणी विचारवंक वगेरे इथे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करण्यासाठी येतात. आज दि. ०१ ऑगस्ट रोजीही जयंतीनिमित्त लोकशाहिर अण्णाभाऊ साठेच्या प्रतिमेला अभिवादन आणि विचार प्रतिभेचा जागर करण्यासाठी मान्यवर इथे उपस्थित होते. जितेंद्र आव्हाडही आले होते.

मान्यवरांना व्यासपिठावर मनोगत व्यक्त करतात. जितेंद्र आव्हाडही मनोगत व्यक्त करण्यास उभे राहिले. मात्र त्यांनी राजकीय वक्तव्य करायला सुरवात केली. ”राहुल गांधीची जात संसदेत विचारली गेली. तीन महिन्यानी हे सरकार पडेल आम्ही सत्तेवर येऊ ” असे म्हणत त्यांनी समाजाच्या व्यासपीठावर संपूर्ण राजकीय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे उपस्थित असलेले समाजबांधव संतप्त झाले. त्यांनी आव्हाडांना प्रश्न केला की ”हे व्यासपिठ काय राजकीय होत का? इथे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे ना अभिवादन करण्यासाठी समाज जमला होता तुमचे आणि राहुल गांधीचे राजकारण एकण्यासाठी जमलेला नाही.” समाजाचा विरोध पाहून जितेंद्र आव्हाड पळ काढला.





Powered By Sangraha 9.0