जबरदस्ती धर्मांतरणाविरोधात कायदा कठोर! योगींनी वाढवली शिक्षा

01 Aug 2024 19:41:58
 
Yogi AdItyanath
 
 
लखनऊ (Yogi Adityanath) : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी धर्मांतरणविरोधी कायद्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ३१ जुलै रोजी, धर्मांतर बंदी (दुरूस्ती) विधेयक २०२४ मंजूर केले. कायदा अधिक कठोर करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी धर्मांतरविरोधी कायद्यात सुधारणा करून नवीन विधेयक सादर केले आहे.
 
या कायद्यानुसार, शिक्षा ही १० वर्षे आणि ५० हजार रूपये दंडाची तरतूद होती. या कायद्यातील सुधारणानंतर बदल करण्यात आला आहे. धार्मिक धर्मांतर संबंधित गुन्ह्यासाठी शिक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. बेकायदेशीर धर्मपरिवर्तन हा कायदा बनवण्यात आला आहे. यामध्ये आता ३ ते १० वर्षांचा तुरूंवास होऊ शकतो. परकिय निधीचा वापर करत सामूहिक धर्मांतरण किंवा धर्मांतर केल्यास ७ ते १४ वर्षाचा कारावास होऊ शकतो, असा योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी कायद्याबाबत निर्णय घेतला.
 
धर्मपरिवर्तनासाठी विवाहाच्या भुलथापा दिल्यास २० वर्षांपर्यंत शिक्षा होईल. कारावास ते जन्मठेप तसेच अल्पवयीन महिला आणि इतर व्यक्तींना भुलथापा देऊन तस्करी केल्यास २० वर्षांपर्यंत जन्मठेप शिक्षा होऊ शकते. बेकायदेशीर धर्मांतर कायद्यात कोणतीही पीडित व्यक्ती, त्यांचे आई, वडील, भावंड, तसेच दत्तक याप्रकरणी कोणीही तक्रार दाखल करू शकतात.
 
कायद्यातील तरतुदींमध्ये उल्लघनांशी संबंधित माहिती कोणत्याही व्यक्तीला दिली जाणार नसल्याचे या विधेयकात म्हटले आहे. महिलांवर दबाव आणून त्यांना विवाहासाठी प्रवृत्त केल्यास त्यांना २० वर्षे कारावासाची शिक्षा होऊ शकते. कदाचित त्यामध्ये बदल करून जन्मठेप देखील दिली जाऊ शकते असा बदल कायद्यात करण्यात आला आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0