मुंबई : २०२१ रोजी आलेली 'स्क्वीड गेम' ही वेबसीरिज विशेष गाजली होती. एकीकडे संपूर्ण जग महामारीचा सामना करत होतं आणि दुसरीकडे आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी 'स्क्वीड गेम' या वेबसीरिजने मनोरंजनाचा बूस्टर डोस देण्याचं काम केलं होत. जगभरात या वेब सीरीजचे चाहते आहेत आणि दुसरा सीझन कधी येणार याची ते वाट पाहात होते. आता प्रतीक्षा संपली असून नुकताच 'स्क्वीड गेम 2'चा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे रिलीज कधी होणार याबद्दलही खुलासा करण्यात आला आहे.
'स्क्वीड गेम २' चा प्रोमो आज पहाटे रिलीज झाला असून तीन वर्षानंतर गेम खेळायला तयार आहात का? असं या प्रोमोत पाहायला मिळतं. पुढे on your mark अशी घोषणा केली जाते. सर्व स्पर्धक शर्यतीत धावण्यासाठी सज्ज असतात. पण यातील काही स्पर्धक खाली कोसळतात. या सर्वांना मास्क मॅन नियंत्रणात ठेवताना दिसत आहे. शेवटी डोळ्यांनी मारणारी बाहुली दिसते. पुढे 'स्क्वीड गेम 2' अशी अक्षरं स्क्रीनवर दिसतात आणि सीरिजची घोषणा केली जाते.
‘स्क्व गेम 2' सीरिज २६ डिसेंबर २०२४ ला रिलीज होणार आहे. इतकंच नव्हे 'स्क्वीड गेम 2' च्या मेकर्सने सीरिजच्या फायनल सीझनची घोषणा केली असून तो २०२५ ला येणार असल्याचे अधिकृतरित्या जाहिर करण्यात आलं आहे.