हिमाचलमध्ये ढगफुटी ; १० जण बेपत्ता एकाचा मृत्यू

01 Aug 2024 15:02:47

Himachal
 
नवी दिल्ली : हिमाचलमध्ये तीन ठिकाणी ढगफुटी झाली आहे. शिमल्यापासून १०० किमी दूर असणाऱ्या रामपूरच्या झाकडी आणि मंडी जिल्ह्यातील राजवन गावामध्ये ढगफुटी झाली आहे. यामुळे कुल्लु, मंडी आणि शिमला या ठिकाणांची परिस्थिती अतिशय विस्कळीत झाली आहे. याचा मोठा परिणाम शाळा, इमारत ,घरे, आणि रुग्णालयांवर झाला आहे. हिमाचल प्रदेशात काल ३१ जुलैला तुफान पाऊस झाला आणि तीन ठिकाणी ढगफुटी झाली आहे.
 
हिमाचलमधील झालेल्या ढगफुटीमुळे १० जण बेपत्ता तर एकाचा मृत्यु झाला आहे. शुक्रवारी हवामान विभागाने राज्यातील विविध ठिकाणांना बुधवारीच अतिमुसळधार पावसाचा यलो अर्लट जारी केला होता, तर आता ६ ऑगस्टपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची टीम तेथे तातडीने रवाना करण्यात आली. तर पोलिस रेस्क्यू टीम देखील तेथे पोहचली आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0