'भूल भुलैया ३' बद्दल मोठी अपडेट आली समोर

01 Aug 2024 15:32:46

bhool bhulaiya 3 
 
 
मुंबई : अक्षय कुमार, विद्या बालन यांची प्रमुख भूमिका असलेल्या भूल भूलैय्या या चित्रपटाने २००७ साली प्रेक्षकांना एक नवी पर्वणी देऊ केली होती. सायकोलॉजिकल कॉमेडी हॉरर असलेल्या या चित्रपटाचा त्यानंतर दुसरा भाग आला 'भूल भुलैया 2'. ज्यात अभिनेता कार्तिक आर्यन प्रमुख भूमिकेत होता. आता या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे २०२४ ला दिवाळीच्या मुहूर्तावर भूल भुलैया ३ चित्रपटगृहात दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे.
 
भूल भुलैया ३ मध्ये कार्तिक आर्यन सोबत तृप्ती डिमरी, विद्या बालन आणि माधुरी दीक्षित एकत्रित दिसणार आहेत. या चित्रपटाचे शुटींग अगदी अंतिम टप्प्यात आले असून येत्या २ ऑगस्टपर्यंत ते पुर्ण होईल अशी माहिती मिळत आहे.
 
अनीस बज्मी दिग्दर्शित आणि भूषण कुमार निर्मित, 'भूल भुलैया 3' चित्रपटाचा टीझर ऑगस्टच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात प्रदर्शित केला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या चित्रपटात राजपाल यादव आणि संजय मिश्रा हे कॉमेडीचा तडका लावताना देखील दिसणार आहेत.
Powered By Sangraha 9.0