मुंबई : 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरांत पोहोचणाऱ्या पाठक बाई अर्थात अभिनेत्री अक्षया देवधर हिने आता एक नवी सुरुवात केली आहे. अभिनय क्षेत्रानंतर आता तिने व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकले आहे. काही दिवसांपुर्वी तिने सोशल मिडियावर लवकरच आनंदाची बातमी देणार अशा आशयाची पोस्ट केली होती. आणि आता त्याचे उत्तर तिने आणखी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे केली आहे.
अक्षयाने याबाबत तिच्या चाहत्यांना माहिती दिली आहे. अक्षयाने भरजरी नावाचा नवीन ब्रँड सुरू केला आहे. हा एक साडीचा ब्रँड आहे. याबाबत तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. "‘भरजरी’ - नाम (निधी, अक्षया आणि माधुरी)...आम्हा तिघींच हे स्वप्न... प्रत्येकीने आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्यात पाहिलेलं. एकत्र येऊन पूर्ण करत आहोत. तुमच्या साथीने, विश्वासाने आणि प्रेमाने हे पाऊल पुढे टाकत आहोत. आपल्या ‘भरजरी’चे नवीन दालन लवकरच सुरू होत आहे. प्रेम कायम असू दे...आमच्यावरही आणि आपल्या ‘भरजरी’वरही", असं तिने पोस्टमध्ये लिहिले आहे.