आठवड्याच्या सुरूवातीस सोने दरात घसरण; जाणून घ्या आजचा भाव!

    09-Jul-2024
Total Views |
gold rate mcx market

 
मुंबई :        मागील दोन दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आज सराफा बाजारात किमतीत मोठी घट होत मुंबई शहरात २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ७३,३४१ रुपये इतका आहे. तर चांदी प्रति किलो ९०,०८० रुपये असल्याचे पाहायला मिळत आहे. 


हे वाचलंत का? -     हायब्रीड कारकरिता नो रजिस्ट्रेशन टॅक्स; EVs विक्रीस चालना मिळणार!


दरम्यान, काल सराफा बाजारात सोन्याचा दर प्रति तोळा ७३,८७५ रुपये इतका होता. कालच्या दरात ३३० रुपयांची घट झाल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात दि. ०३ रोजी सोन्याचा भाव प्रति तोळा ७३,३४१ रुपये इतका सराफा बाजारात दिसून आला होता. तर चांदी ८८,१९० रुपये प्रति किलो इतका दिसून येत आहे. 

मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (एमसीएक्स)च्या मानकानुसार, देशात सोन्याचा दर प्रति तोळा ७२,३८९ रुपये इतका आहे. सुवर्ण दरात चढउताराचे सत्र दिसल्यानंतर आता आठवड्याची सुरुवात नरमाईने झाली आहे. जगातील अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी उन्हाळ्यात सोने खरेदीचा सपाटा लावल्याने भाव वधारले होते. परंतु, आता बँकांनी आवक घटवल्याने सोन्याने नरमाईचा सूर आळवला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीस सोन्याने घसरणीचे संकेत दिले आहे.