दिग्गज गायिका उषा उत्थुप यांचे पती जानी चाको यांचं निधन

    09-Jul-2024
Total Views |

usha 
 
 
मुंबई : हिंदी मनोरंजनसृष्टीतील सुप्रसिद्ध गायिका उषा उत्थुप यांचे पती जानी चाको उत्थुप यांचे सोमवार दिनांक ८ जुलै २०२४ रोजी कोलकाता येथे निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची ७८ व्या वर्षी प्राणज्योत मालवली. उषा उत्थुप यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पतीला संपुर्ण चित्रपटसृष्टीतून आदरांजली वाहिली आहे. दरम्यान, उषा आणि जानी यांना अंजली आणि सनी ही मुलं आहेत.
 
 
 
 
उषा उत्थुप यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, जानी त्यांच्या घरी टीव्ही पाहत होते आणि त्यादरम्यान त्यांना अस्वस्थ वाटण्यात सुरुवात झाली.आणि तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जानी चाको यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे डॉक्टरांनी सांगितली असून आज ९ जुलै २०२४ रोजी जानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.