ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडेकर यांची वाशिममध्ये बदली

    09-Jul-2024
Total Views |

Pooja khedkar
 
पुणे : खासगी वाहनावर लाल दिवा लावणे तसेच अधिकाऱ्यांचे चेंबर बळकावल्याच्या आरोपांमुळे ट्रेनी आयएएस पूजा खेडेकर यांची बदली झाली आहे. वाशिम जिल्हाधिकारी म्हणून त्यांची बदली करण्यात आली आहे. आयएएस असलेल्या पूजा खेडकर यांना ३ जुन २०२४ पासून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात शिकाऊ अधिकारी म्हणून पाठवण्यात आले होते.
 
खेडकर यांच्याविरोधात पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य अप्पर सचिवांकडे पत्र लिहून अहवाल देखील सादर केला. आणि या अहवालात त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे चेंबर बळकावल्यापासून ते खासगी गाडीवर महाराष्ट्र शासन लिहिले या सगळ्याचा त्या पत्रात उल्लेख करत पूजा खेडकर यांची प्रशिक्षणासाठी दुसऱ्या जिल्ह्यात नेमणूक करावी.
 
पूजा खेडकर कोण आहेत ?
 पुजा खेडकर २०२३ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. अहमदमगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे राहणाऱ्या आहेत माजी सनदी अधिकारी यांची त्या कन्या आहेत. दिलीप खेडकर हे प्रदुषण विभागाचे आयुक्त होते. तर त्यांचे आजोबाही आयएएस अधिकारी होते.