समृद्ध सांस्कृतिक वारशाची आठवण करून देणारे १४ व्या शतकातील शिवलिंग

    09-Jul-2024
Total Views |

Shivlinga

मुंबई (प्रतिनिधी) :
आंध्र प्रदेशातील श्रीशैलम (Shivlinga Andhra Pradesh) भ्रमरम्बिका मल्लिकार्जुन स्वामी मंदिराजवळ दि. ५ जून रोजी यू-फी थिएटरजवळ एक प्राचीन शिवलिंग सापडले आहे. दगडी शिलालेख आणि प्राचीन शिवलिंगाच्या शोधाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. जमिनीचे सपाटीकरण करताना हे शिवलिंग सापडले. हा शोध आणखी आकर्षक यासाठी बनतो कारण नंदीच्या मूर्तीचाही याठिकाणी समावेश असल्याचे आढळून आले. मंदिर अधिकाऱ्यांनी शिलालेखाचे फोटो पुढील विश्लेषणासाठी म्हैसूर येथील पुरातत्व विभागाकडे पाठवले आहेत.

हे वाचलंत का? : जगन्नाथ पूरी रथयात्रेसंदर्भात महत्त्वाची अपडेट

तज्ज्ञांनी शिलालेखाचा अभ्यास केल्यावर पुष्टी केली की त्यामध्ये सारंगधारा मठ आणि रुद्राक्ष मठाच्या दरम्यान असलेल्या चक्र गुंडम येथे कंपिलेय यांनी शिवलिंग आणि नंदीची स्थापना केल्याचा उल्लेख आहे. पूर्वी या भागात चतुर्मुख शिवलिंग सापडले होते. तसेच पंचमठाच्या नूतनीकरणादरम्यान अनेक तांब्याचे शिलालेख तसेच सोन्या-चांदीची नाणी सापडली होती.

प्राचीन शिवलिंगाच्या शोधामुळे भगवान शिवाच्या भक्तांना आनंद झाला आहे, जे विशेष प्रार्थना करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. शतकानुशतके, या पवित्र स्थळाने आदि शंकराचार्य, श्री कृष्ण देवराय, छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर अनेक आध्यात्मिक दिग्गजांसह अनेक आदरणीय व्यक्तिमत्त्वांना आकर्षित केले आहे. सत्ययुगातील नरसिंहस्वामी, त्रेतायुगाममधील श्री राम आणि सीता देवी आणि द्वापरयुगममधील पाचही पांडवांनी या ठिकाणी भेट दिल्याचे मानले जाते. याशिवाय, कलयुगातील असंख्य योगी, ऋषी, मुनी, उपदेशक, अध्यात्मिक गुरु, राजे, कवी आणि श्रद्धाळू यात्रेकरूंनीही या पवित्र स्थानावर प्रवेश केला आहे.