४६ साक्षीदार, २२ पंचनामे आणि १७३५ पानी आरोपपत्र; सलमानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट

    09-Jul-2024
Total Views |

Salman Khan 
 
 
मुंबई : अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी ९ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. तसेच, या प्रकरणी गुन्हे शाखेने विशेष मोक्का कायद्याअंतर्गत १७३५ पानांचे आरोपपत्र दाखल केले. १४ एप्रिल रोजी सलमानच्या बांद्रा येथील गॅलेक्सी अपार्टमेन्टवर गोळीबार करण्यात आळा होता.
 
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई गुन्हे शाखेने दाखल केललेया आरोपपत्रात हरपाल सिंग, विक्की कुमार गुप्ता, सागर कुमार पाल, मोहम्मद रफिक सरदार चौधरी, दिवंगत अनुज थापन आणि सोनू सुभाषचंद्र बिश्नोई या सहा अटकेत असणाऱ्या आरोपींच्या सहभागाची तपशीलवार माहिती देण्यात आली असून लॉरेन्स बिश्नोईसह तीन वाँटेड आरोपींचीही आरोपपत्रात नावे नमूद करण्यात आली आहेत.
 
याशिवाय एका अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, या आरोपपत्रात तीन खंडांमध्ये विविध तपास कागदपत्रांचा समावेश आहे. या दस्तऐवजांमध्ये सीआरपीसी कलम १६४ अंतर्गत नोंदवलेल्या ४६ साक्षीदारांचे जबाब, मोक्का कायद्यांतर्गत कबुली जवाब, २२ पंचनामे आणि विविध तांत्रिक पुराव्यांचा समावेश देखील करण्यात आला आहे.
 
गोळीबार प्रकरणाशी बिश्नोई टोळीचा संबंध समोर आला होता. तुरुंगात बंद असलेल्या लॉरेन्स बिश्नोई या गँगस्टरचा भाऊ अनमोल बिश्नोई याने सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वत: स्वीकारली होती.