"बालबुद्धी संकटग्रस्त भागाच्या पर्यटनात व्यस्त"; भाजपचा राहुल गाधींवर घणाघात

    09-Jul-2024
Total Views |
 rahul gandhi
 
मुंबई : "बालबुद्धी संकटग्रस्त भागाच्या पर्यटनात व्यस्त आहे." अशी घणाघाती टीका भाजप नेते अमित मालवीय यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर केली. त्यांनी हे वक्तव्य राहुल गांधीच्या नुकत्याच झालेल्या मणिपूर दौऱ्याबाबत केले. अमित मालवीय यांनी एक्सवर पोस्ट करत काँग्रेसच्या शासनकाळात मणिपूरमधील हिंसाचाराची माहिती दिली.
 
मणिपूर हिंसाचारावर माहिती देताना अमित मालवीय यांनी लिहिले की, "1990 मध्ये 300 लोक मारले गेले. 1993 मध्ये 1,100 लोक मारले गेले. 1997 मध्ये 400 लोक मारले गेले. 2001 मध्ये 95 लोक मारले गेले. 2003 मध्ये 140 लोक मारले गेले. 2006 मध्ये 105 लोक मारले गेले. 2008 मध्ये. 2010 मध्ये 200 लोक मारले गेले आणि 2012 मध्ये 165 लोक मारले गेले. तिसऱ्यांदा अपयशी ठरलेल्या राहुल गांधींना विसरा, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह कोणत्याही काँग्रेसच्या नेत्याने संघर्षग्रस्त प्रदेशाचा दौरा केला होता का? संकटग्रस्त भागाचे पर्यटन."