राहुल गांधी तुम्ही हिंदू धर्माला मानता का? रायबरेलीकरांनी आपल्या खासदाराला विचारला प्रश्न

    09-Jul-2024
Total Views |
 Rahul Gandhi Raebareli
 
लखनौ : काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात त्यांच्याच लोकसभा मतदारसंघात पोस्टर लावण्यात आले आहेत. राहुल गांधी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली येथून विजयी झाले होते, तथापि, त्यांनी बहीण प्रियंका गांधी यांच्यासाठी वायनाडची जागा सोडली आणि रायबरेली स्वतःसाठी ठेवली. आता त्यांच्या रायबरेली दौऱ्याच्या आधी ‘राहुल गांधी उत्तर द्या’ चे पोस्टर्स लागले आहेत.
 
या पोस्टरमध्ये राहुल गांधींना विचारण्यात आले आहे की, ज्या रायबरेलीच्या हिंदू मतदाराने त्यांना आपले अमूल्य मत दिले, तो हिंसक आहे का? तसेच तुम्ही हिंदू धर्म मानतात की नाही, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. राहुल गांधींना ते कोणत्या धर्माचे आहेत हे स्पष्ट करण्यास सांगितले आहे. जनतेने खासदारांना विचारले आहे की भविष्यात सायबरेलीच्या हिंदू मतदारांनी त्यांना शिवीगाळ करण्यासाठी मतदान करावे का? असा प्रश्नही राहुल गांधींना पोस्टरमध्ये विचारण्यात आला आहे.
  
विरोधी पक्षनेते या नात्याने आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी हिंदूंना केवळ हिंसक म्हटले नाही तर महादेवाबद्दल चुकीचे वक्तव्य केले. दुसरीकडे, राहुल गांधी आता डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांनी रायबरेलीच्या चुरुवा हनुमान मंदिरात प्रार्थना केली. यावेळी त्यांनी गळ्यात भगवा फेटा घातला होता आणि टिळकही लावले होते. त्यांनी शहीद अंशुमन सिंह यांच्या आईचीही भेट घेतली. लोकसभेतील गोंधळानंतर ते डॅमेज कंट्रोलसाठी हे सर्व करत असल्याचे सांगण्यात येत आहे.