Kalki 2898 AD ने जगभरात रचला इतिहास; १००० कोटींच्या टप्प्याकडे वाटचाल

    09-Jul-2024
Total Views |

Kalki 2898 AD 
 
 
 
मुंबई : दिग्दर्शक नाग अश्विन यांचा 'कल्की 2898 एडी' हा मल्टी स्टारर चित्रपट सध्या देशातच नाही तर जगभरात बॉक्स ऑफिसवर कमालीचा धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चिक्कार कमाई कर जगभरात इतिहास रचला आहे.
 
'कल्की 2898 एडी' चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात ८०० कोटींचा टप्पा गाठला आहे. जगभरात ९०० कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट बॉक्स-ऑफिसवर १००० कोटींच्या दिशेने यशस्वी वाटचाल करत आहे.
 

Kalki 2898 AD 
 
'कल्की 2898 एडी' चे प्रदर्शनापासून १२ दिवसांचे एकूण कलेक्शन ५२१ कोटी ४ लाखांपर्यंत पोहोचले आहे. तेलुगू भाषेत भारतात २४९ कोटी कमावले तर हिंदी भाषेमध्ये २१८ कोटी ९ लाख रुपये कमावले आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पडूकोण आणि कमल हासन प्रमुख भूमिकेत आहेत.