जगन्नाथ पूरी रथयात्रेसंदर्भात महत्त्वाची अपडेट

    09-Jul-2024
Total Views |

Jagannath Rathayatra

मुंबई (प्रतिनिधी) :
जगन्नाथ पुरी (Jagannath Puri Rathayatra) येथील रथात्रेच्या पहिल्या टप्प्याची सांगता नुकतीच झाली. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचे रथ पुरीच्या गुंडीचा मंदिरात पोहोचले. यावेळी हजारो भाविकांनी जगन्नाथाचा रथ ओढला. लाखो भाविक मिरवणूक पाहण्यासाठी पुरीच्या ग्रँड रोडवर जमले होते. भावंड देवतांची रथयात्रा रविवारी दुपारी सुरू झाली. सोमवारी या देवतांना विधीवत मिरवणुकीत मंदिरात नेण्यात येईल. देवता श्री गुंडीचा मंदिरात आठवडाभर राहतील आणि नंतर श्री मंदिराकडे परतीचा प्रवास सुरू करतील, जी ‘बहुदा यात्रा’ म्हणून प्रसिद्ध आहे.