जम्मू- काश्मीरमध्ये चार जवान हुतात्मा

    09-Jul-2024
Total Views |

Army
 
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात सोमवारी दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये चकमक झाली. या घटनेत लष्कराचे 4 जवानांना वीरमरण आले, तर 6 जण जखमी झाले. कठुआ शहरापासून 150 किमी अंतरावर लोहाई मल्हारमधील बदनोटा गावात ही घटना घडली.
 
लष्कराची काही वाहने या भागात नियमित गस्तीवर असताना दहशतवाद्यांनी त्यांना लक्ष्य केले. सुरुवातीच्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर ग्रेनेड फेकले आणि नंतर गोळीबार केला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले, मात्र दहशतवादी जवळच्या जंगलात पळून गेले.