कल्याणमध्ये मेडिकल दुकानाचा परवाना देण्यासाठी70 हजाराची लाच घेताना औषध निरीक्षकास अटक

कल्याणमध्ये मेडिकल दुकानाचा परवाना देण्यासाठी 70 हजाराची लाच घेताना औषध निरीक्षकास अटक

    09-Jul-2024
Total Views |

lacha

डोंबिवली : मेडिकल दुकानाचा परवाना मंजूर करण्यासाठी तब्बल 70 हजारांची लाच घेताना ठाणे अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफ डी ए) औषध निरीक्षकासह खासगी व्यक्तीला नवी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. कल्याण पश्चिमेतील डी मार्टसमोर सापळा रचून नवी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सायंकाळी ही कारवाई केली आहे.

औषध निरीक्षक संदीप नारायण नरवणे याला अटक करण्यात आली आहे. नरवणे यांचा साथीदार सुनिल बाळू चौधरी याला ही पोलिसांनी अटक केली आहे. ज्याच्याकडून नरवणे याने लाच स्विकारली तो दुकानदार कल्याणचा रहिवासी आहे. त्याला कल्याणमध्ये मेडिकलचे दुकान सुरू करायचे आहे. मेडिकलचे दुकान सुरू अन्न व औषध विभागाचा परवाना लागतो. कल्याणच्या एका तरूणाला मेडिकलचे दुकान सुरू करायचे होते. त्यांनी अन्न व औषध विभागाकडे तसा अर्ज केला होता. त्यांना परवाना देण्याच्या बदल्यात औषध निरीक्षक नरवणे याने 1 लाख रूपयांची मागणी केली होती. 1 लाख रूपये दिले तरच परवाना दिला जाईल असे सांगितले होते. अखेरीस तडजोड करून नरवणे यांनी 70 हजार रुपये घेण्याचे कबूल केले. याप्रकरणी तक्रारदाराने नवी मुंबईतील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांकडे तक्रार केली होती. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी कल्याण पश्चिमेत सापळा रचला होता. यावेळी त्याठिकाणी तक्रारदाराकडून लाच स्वीकारण्यासाठी औषध निरीक्षक संदीप नरवणे यांच्यासह त्यांचे साथीदार सुनिल चौधरी ही त्याठिकाणी पोहोचले. यावेळी 70 हजार रूपयांची लाच स्वीकारताना दोघांनी ही पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी केली आहे. या प्रकरणी नरवणे यांच्यासह त्यांच्या साथीदार चौधरी या दोघांच्या विरोधात महात्मा फुले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.