वैनगंगा-नळगंगा प्रकल्प मार्गी लागणार! उपमुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट

    09-Jul-2024
Total Views |
 
Fadanvis & Ramesh Bais
 
मुंबई : विदर्भाची तहान भागविण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प अखेर मार्गी लागणार आहे. या प्रकल्पाला लवकरात लवकर मंजुरी मिळावी, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, दि. ९ जुलै रोजी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली.
हे वाचलंत का? -  एकापेक्षा एक! वडील नटसम्राट आणि लेक नृत्यसम्राट
 
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा आदी विदर्भातील ६ जिल्ह्यांतून जाणार असून १५ तालुक्यांना त्याचा लाभ होणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे ३ लाख ७१ हजार २७७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. या प्रकल्पातील ३२ दलघमी पाणी हे घरगुती वापरासाठी असून ३९७ दलघमी पाणी औद्योगिक वापरासाठी राहणार आहे. या नदीजोड प्रकल्पावर कालव्याद्वारे १ हजार ८८४ सौर ऊर्जा निर्मिती होणार आहे. या ४२६.५ किलोमीटर लांबीच्या कालव्यातून ४० साठा तलावात पाणी नेण्यात येणार आहे.