महाविद्यालयात मुलींसमोर गुप्तांग दाखवून अश्लील कृत्य; आरोपी अयुब उर रहमान पोलिसांच्या ताब्यात

    09-Jul-2024
Total Views |
 banglour
 
बंगलोर : बंगलोर येथील महिला महाविद्यालयाबाहेर अश्लील कृत्य करणाऱ्या अयुब उर रहमानला पोलिसांनी अटक केली आहे. तो अनेक दिवसांपासून सतत अनेक कॉलेजच्या बाहेर गुप्तांग दाखवून अश्लील कृत्य करत होता. त्याचा व्हिडिओही नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अयुब उर रहमान बेंगळुरूच्या व्हीव्ही पुरम भागातील जैन कॉलेजच्या बाहेर विद्यार्थिनींना लिंग दाखवत असे. तो येथे स्कूटरवर यायचा आणि ओळख पटू नये म्हणून तोंडावर मास्क लावायचा. हे तो सतत करत होता. एके दिवशी, त्याच्या छळामुळे त्रासलेल्या विद्यार्थिनींनी त्याचा प्रायव्हेट पार्ट दाखवणारा एक व्हिडिओ बनवला, ज्यामध्ये तो घाणेरडा कृत्य करताना दिसत आहे.
 
व्हिडिओ बनवणाऱ्यांनी पोलिसांना पाठवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. यानंतर सोशल मीडियावर त्याच्या अटकेची मागणी होऊ लागली. यानंतर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सीसीटीव्ही व्हिडिओ काढून त्याची ओळख पटवली. तपासानंतर अयुब उर रहमानला सोमवार, दि. ८ जुलै २०२४ अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. कॉलेजमध्ये वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसमोर तो सतत हे कृत्य करत असे, अशी माहिती समोर आली आहे.
 
अयुब उर रहमान बेंगळुरूमध्ये चहाचे दुकान चालवतात. तो ४८ वर्षांचा आहे. त्याच्या या कृत्याबाबत पोलीस आता त्याची चौकशी करत आहेत. महिलांसमोर हे अश्लील कृत्य का करतो, असे विचारले असता त्याने यासंदर्भात काहीही सांगण्यास नकार दिला. या संदर्भात पोलिसांनी सांगितले की, “आरोपी अयुब उर रहमान हा स्कूटरवरून जात होता आणि कॉलेजजवळून चालत जाणाऱ्या मुलींच्या गटाशी अश्लील चाळे करत होता. एका मुलीने त्याचे छायाचित्र काढून X (पहिले ट्विटर) वर पोस्ट केले. अयुबने आपला चेहरा कापडाने झाकलेला होता पण त्याच्या स्कूटरची नंबर प्लेट दिसत होती, ज्यामुळे त्याला अटक करण्यात आली.”