मुंबई विद्यापीठात नोकरीची सुवर्ण संधी!

मुंबई विद्यापीठात नोकरीसाठी भरती सुरु...

    09-Jul-2024
Total Views |

Mumbai U.
 
मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक संधी उपलब्ध झालेली आहे . मुंबई विद्यापीठ अंतर्गत नोकरी मिळणार आहे. यामध्ये एकूण जागा १५२ आहेत. तर शैक्षणिक पात्रता ही पदाच्या अवश्यकतेनुसार आहे. प्राध्यापक,सहयोगी प्राध्यापक , उपग्रंथपाल , सहाय्यक प्राध्यापक ,सहाय्यक ग्रंथपाल या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. 
 
उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरणे अवश्यक आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ ऑगस्ट २०२४ असून अर्जदारांना अधिक माहिती मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर मिळेल. उमेदवाराची निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे घेण्यात येईल. मुलाखतीची तारीख ७ ऑगस्ट २०२४ आहे.
 
उमेदवारांनी मुळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित राहणे अवश्यक आहे. तसेच मुलाखतीसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही. उमेदवाराची अंतिम निवड वैयक्तित मुलाखतीतील कामगिरीवर आधारित होईल.