वाहन उद्योगातील अग्रणी कंपनीच्या मोटर्स विक्रीत वाढ!

    08-Jul-2024
Total Views |
tata motors sales first quarters


मुंबई :       वाहन उद्योग क्षेत्रातील अग्रणी कंपनी टाटा मोटर्सने आर्थिक वर्ष २५ चा तिमाही निकाल जाहीर केला आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत कंपनी जागतिक घाऊक विक्रीत २ टक्के वाढ नोंदविली आहे. तसेच, टाटा मोटर्स कंपनीच्या मोटर्स विक्री झालेल्या युनिट्सची संख्या ३ लाख २९ हजार ९४७ इतकी वधारली आहे. यात जग्वार लँड रोव्हर गाड्यांच्या विक्रीचा समावेश आहे.

दरम्यान, टाटा मोटर्सची चांगली मागणी लक्षात घेऊन, कंपनीने अलीकडेच ‘टाटा मोटर्स फ्लीट व्हर्स’ लाँच केले आहे. कंपनीच्या व्यावसायिक वाहनांच्या संपूर्ण श्रेणीसाठी एक व्यापक डिजिटल मार्केटप्लेस आहे. वाहन शोध, कॉन्फिगरेशन, बुकिंग आणि वित्तपुरवठा यांसारखी वैशिष्ट्ये ऑफर करून व्यावसायिक वाहन मालकीचा अनुभव सुव्यवस्थित करणे हे या प्लॅटफॉर्मचे उद्दिष्ट असल्याची माहिती आहे.

दक्षिण कोरियामध्ये मुख्यालय असलेली व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी (Tata Daewoo) श्रेणी, टाटा मोटर्सची पूर्ण मालकीची उपकंपनी यासह कंपनीच्या व्यावसायिक वाहनांच्या विक्रीला मागणी वाढली आहे. यामुळे वार्षिक ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे, टाटा मोटर्सची उपकंपनी असलेल्या जग्वार लँड रोव्हर (JLR) ने आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या तिमाहीत ९७,७५५ युनिट्सपर्यंत विक्रीत तब्बल ५ टक्के वाढ नोंदविली आहे.