मुसळधार पावसाचा विमानसेवेला फटका; २७ उड्डाणे डायव्हर्ट!

    08-Jul-2024
Total Views |
mumbai heavy rain airlines


नवी दिल्ली  :      सकाळपासूनच मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. शहरातल्या बऱ्याच भागात मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याचे पाहायला मिळाले आहे. या पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीसह रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. विशेष म्हणजे या मुसळधार पावसात विमानसेवादेखील विस्कळीत झाली आहे.


हे वाचलंत का? -    विमा कंपन्यांच्या प्रीमियममध्ये २३ टक्क्यांनी वाढ!


दरम्यान, मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळावरील २७ उड्डाणे वळविण्यात आली असून आणखी ५१ विमानसेवा रद्द करण्यात आली आहे. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास विमानतळावर इंडिगोची सुमारे ४२ उड्डाणे, एअर इंडियाची ६ उड्डाणे, २ अलायन्स एअरची उड्डाणे आणि १ कतार एअरवेजची उड्डाणे रद्द करण्यात आली आहे.
 
देशाच्या आर्थिक राजधानीत मुसळधार पावसामुळे किमान २७ उड्डाणे वळवण्यात आली तर ५१ विमानसेवा रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शहरातील मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानतेमुळे पहाटे ०२:२२ ते पहाटे ०३:४० पर्यंत धावपट्टीचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे. तसेच, २७ उड्डाणे अहमदाबाद, हैदराबाद आणि इंदूर या शहरांकडे वळवण्यात आली आहेत.