हॉटेल व्यावसायिक झाले संगीतकार सलील कुलकर्णी! आईच्या हस्ते केलं 'बँगलोर कँटीन'चं उद्घाटन

    08-Jul-2024
Total Views |

salil kulkarni 
 
 
 
मुंबई : संगीतकार, गीतकार डॉ. सलील कुलकर्णी मराठी मनोरंजन विश्व आणि संगीत क्षेत्रातील मोठं नाव. तसेच, एक सच्चा क्रिकेटप्रेमी म्हणूनही त्यांची ओळख आहे. आता सलील यांनी एका नव्या व्यवसायात पदार्पण केले आहे. सलील यांनी हॉटेल व्यवसायात नवी झेप घेतली असून, खाण्याची आवड जोपासत या उद्योगात एन्ट्री केली आहे. अलीकडेच त्यांच्या या नव्या हॉटेलचं उद्घाटन झालं असून त्यांनी कुटुंबीयांसोबत एक फोटोही शेअर केला आहे.
 
दरम्यान, सलील यांनी ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली असून त्यांनी म्हटलं होतं की, पुण्यातील बँगलोर कँटीन या हॉटेलची चव त्यांना विशेष आवडली होती. त्याठिकाणचा डोसा आणि कॉफी पिऊन त्यांना असे वाटलेले की यामध्ये आपलाही सहभाग हवा. म्हणून ते आता 'बँगलोर कँटीन' या व्हेंचरशी जोडले गेले आहेत. त्यांनी या हॉटेलची नवीन शाखा सिंहगडच्या खाऊगल्लीमध्ये सुरू केली आहे.
 

salil kulkarni 
 
'बँगलोर कँटीन' या नव्या ब्रँचचे उद्घाटन त्यांनी त्यांच्या आईच्या हस्ते या नव्या जागेचे उद्घाटन केले. या उद्घाटनावेळचा फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले की, 'लहानपणी आई आम्हाला डोसा खायला घेऊन जायची. काल आम्ही तिच्या हस्ते बँगलोर कँटीनचं उद्घाटन केलं. नक्की भेट द्या सिंहगड रोड खाऊगल्ली येथील बँगलोर कँटीनला'.