मुसळधार पावसात On Duty मुंबई पोलिसांना सिद्धार्थ जाधवचा कडक Salute!

    08-Jul-2024
Total Views |

siddharth jadhav 
 
 
मुंबई : मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. मराठीसह हिंदीतही त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याचे विश्व निर्माण केले आहे. याच सगळ्यांच्या लाडक्या सिद्धार्थ जाधवचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालता आहे. आज सकाळपासूनच सुरु असलेल्या जोरदार पावसात मुंबई पोलिस आपल्या जीवाची बाजी लावून ऑन ड्युटी काम करत आहेत. त्यांच्या कामाला सिद्धार्थने सेल्युट केलं आहे.
 
मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, या मुसळधार पावसातही मुंबई पोलीस मात्र त्यांचं कर्तव्य चोखपणे पार पाडत आहेत. मुंबईकरांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या या पोलिसांचे सिद्धार्थने आभार मानले आहेत. सिद्धार्थचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत तो ड्युटीवर असलेल्या पोलिसांबरोबर सेल्फी घेताना दिसत आहे.
 

siddharth jadhav 
 
सिद्धार्थनेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोलिसांबरोबरचा हा सेल्फी शेअर केला असून त्याने सिंबा चित्रपटातील गाण्याचं म्युझिक दिलं आहे. मुंबई पोलीस, सॅल्युट, ऑन ड्युटी, सिंबा असे हॅशटॅगही त्याने या फोटोला दिले आहेत.