बापानेच नवजात मुलीला जिवंत पुरले; आरोपी तय्यब पोलिसांच्या ताब्यात

    08-Jul-2024
Total Views |
 pakistan
 
इस्लामाबाद : पाकिस्तानातील सिंध प्रांतात तय्यब नावाच्या व्यक्तीने आपल्या १५ दिवसांच्या निष्पाप मुलीला जिवंत गाडले. ही बाब उघडकीस येताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. आपल्या मुलीच्या उपचारासाठी आपल्याकडे पैसे नाहीत, म्हणून तिला जिवंत पुरल्याचे मुलीच्या वडिलांनी कबुल केले आहे.
 
तय्यबने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ पुढील कारवाई करत आरोपीला अटक केली. कबर खोदून मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला जेणेकरून पोस्टमॉर्टम करता येईल. तय्यब म्हणाला की, आपण आपल्या नवजात मुलीवर उपचार करू शकलो नाही.
 

त्याने पैशाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला पण यश मिळू शकले नाही. अशा स्थितीत तय्यबने नवजात बाळाला गोणीत ठेवून जमिनीत गाडले. तय्यबविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याची रवानगी कारागृहात केली आहे. मुलीचे शवविच्छेदन करून पुढील कारवाई केली जाईल.
 
पाकिस्तानमध्ये लहान मुलांवर अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत, मात्र या घटनेसोबतच चर्चेत असलेल्या एका प्रकरणात एका महिलेने पतीसह १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. केले. अत्याचारादरम्यान तिला विवस्त्र करून शारीरिक अत्याचार केले.
 
मुलीने तक्रारीत सांगितले की, ती त्या जोडप्याच्या घरी काम करायची, मात्र एके दिवशी हसमने तिला चोरीच्या संशयावरून पकडून ताब्यात घेतले. यानंतर त्याचा शारीरिक छळ करण्यात आला. डॉक्टरांकडे गेल्यावर मुलीच्या हाताला व नाकाला अनेक फ्रॅक्चर असल्याचे आढळून आले. या प्रकरणाचा तपास सुरू असून चौकशीनंतर मुलीला न्याय दिला जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.