मुंबईतील सर्व शाळांना आज सुट्टी जाहिर!

    08-Jul-2024
Total Views |
Mumbai schools will remain closed due to heavy rainfall today
 
मुंबई : मुंबई महानगरात दि. ८ जुलै रोजी जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच दुपारी १.५७ च्या सुमारास समुद्रात ४.४० मीटर उंच भरती येणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महापालिका, शासकीय आणि खासगी शाळांसह महाविद्यालयांच्या दोन्ही सत्रांना सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.
 
दरम्यान मुंबई महानगरात दि. ७ जुलैच्या मध्यरात्री १ वाजल्यापासून सकाळी ७ वाजेपर्यंत सहा तासात विविध ठिकाणी ३०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. काही सखल भागांमध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचले आणि उपनगरीय रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली आहे. विरार ते चर्चगेट लोकल सेवा सुमारे २० ते ३० मिनट उशीराने सुरु आहे.