'कल्की २८९८ एडी' आता ओटीटीवर घालणार धुमाकूळ; पण असणार मोठा ट्विस्ट

    08-Jul-2024
Total Views |

Kalki 2898 AD 
 
 
मुंबई : नाग अश्विन दिग्दर्शित ‘कल्की २८९८ एडी' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने देशभरात ५१० कोटींच्या पुढे तर जगभरात ८३२ कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. आता या चित्रपटाबद्दल आणखी एक मोटी अपडेट समोर आली असून या चित्रपट लवकरच ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. नियमांनुसार, कोणताही चित्रपट प्रदर्शित झाल्यानंचर दोन ते तीन महिन्यांनी ओटीटीवर प्रदर्शित केला जातो, पण कल्कीच्या निर्मात्यांनी एका महिन्याच्या आतच चित्रपट ओटीटीवर येणार असल्याचे जाहिर केले आहे.
 
अॅक्शन ड्रामा आणि पौराणिक कथेवर आधारित 'कल्की २८९८ एडी' चित्रपट इकोनॉमिक टाइम्सच्या नुसार हा दोन वेगवेगळ्या ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर 'कल्की २८९८ एडी' तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रेक्षकांना पाहता येणार आहे, तर हिंदी व्हर्जन इंग्रजी सब-टाइटलह नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार आहे.
 
तसेच, काही रिपोर्ट्सनुसार 'कल्की २८९८ एडी' जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच ओटीटीवर प्रदर्शित होऊ शकतो, असे म्हटले जात होते. पण सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात चित्रपट ओटीटीवर येऊ शकतो. दरम्यान, या मल्टी स्टारर चित्रपटात अमिताभ बच्चन, कमल हासन, प्रभास आणि दीपिका पडूकेण महत्वाच्या भूमिकेत आहेत.