स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य जगाला देणाऱ्या फ्रान्समधील ‘अराजकता’

    08-Jul-2024
Total Views |
france 
 
 
मानव सभ्येतेच्या इतिहासात अनेक क्रांती झाल्या. आपण शाळेत शिकताना इतिहास विषयात अनेक देशात झालेल्या राजकीय क्रांतीविषयी माहिती घेतलेली आहे. ही क्रांती होते, जन आंदोलनातून. यातील महत्त्वाच्या दोन क्रांती आहेत. रशियामध्ये लेनिनने आणलेली क्रांती. या क्रांतीतून रशियातील झारशाही संपुष्टात आली आणि तिथे साम्यवादाचा उदय झाला. या क्रांतीचे इतिहासिक महत्त्व असलं तरी, तिथल्या जनतेला याचा काय लाभ झाला हा प्रश्नचं आहे. कारण, रशियामध्ये जुलमी झारशाहीचा अतं होऊन, लेनिन आणि स्टॅलिनसारख्या हुकुमशाहांची सत्ता आली, ज्यांनी साम्यवादाच्या नावाखाली रशियातील जनतेच्या मोठ्या हालअपेष्टा केल्या. एकूनचं काय तर इतिहासात झालेल्या अनेक राजकीय क्रांतीमधून जनतेच्या हाती काहीच लागलं नाही. फक्त सत्तेचे स्थानांतरण एकाकडून दुसऱ्याकडे झाले. याला अपवाद ठरली ती, १७८९ मध्ये झालेली फ्रेंच राज्यक्रांती.
 
फ्रान्समध्ये झालेल्या या राज्यक्रांतीने फ्रान्समध्ये राज्यशाही संपुष्टात आणून फक्त लोकांच्या हाती सत्ताच दिली नाही. तर जगाला नवी दिशा दिली. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्य जगाला फ्रेंच राज्यक्रांतीनेचं दिली आहेत. पण आज या क्रांतीच्या जवळपास २२५ वर्षानंतर फ्रान्समध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुताच्या जागी अराजकता पाहायला मिळत आहे. या अराजकतेचे तत्कालीक कारण ठरलंय, फ्रान्समध्ये नुकत्याच झालेल्या संसदेच्या सार्वत्रिक निवडणूका. दि. ७ जुलैला दुसऱ्या टप्प्यातील निवडणूका पार पडल्यानंतर फ्रान्समध्ये मतमोजणीस सुरूवात झाली.
 
मतमोजणीच्या आधी सर्व्हेक्षणात उजव्या विचारधारा असलेल्या, मरिन ले पेन यांच्या नेशनल रैली (आरएन) पक्षाला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पहिल्या फेरीतील निवडणुकीत आरएन पक्षाला सर्वाधिक मतदान झाले होते. तर डावी विचारधारेच्या न्यू पॉप्युलर फ्रंट दुसऱ्या क्रमांकावर राहिली होती. तर फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉनच्या उदारमतवादी आघाडीला तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. त्यामुळे दुसऱ्या फेरीत मरिन ले पेन यांची नेशनल रैली सहज बहुमत मिळवेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता.
  
दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रान्समध्ये पहिल्यांदा अति उजव्या पक्षाचे सरकार स्थापन झाले असते. पण, जनादेश मिळत असलेल्या मरिन ले पेन यांच्या पक्षाला बहुमतापासून दूर ठेवण्यासाठी फ्रान्समधील डाव्यांनी आणि मॅक्रॉन यांच्या आघाडीने हातमिळवणी केली आणि नेशनल रैलीच्या विरोधात एकत्र निवडणूक लढवली. याचा फायदा या दोन्ही आघाड्यांना दुसऱ्या फेरीतील निवडणूकीत झाला. दुसऱ्या फेरीतील ५७७ जागांवर झालेल्या निवडणूकांच्या मतमोजणीनंतर समोर आलेल्या आकडेवारीनुसार न्यू पॉप्युलर फ्रंट या डाव्या आघाडीला १८२ जागा मिळाल्या आहेत. यासह इमॅन्युएल मॅक्रॉनची रेनेसान्स पार्टी दुसऱ्या क्रमांकावर राहिली, रेनेसान्सला केवळ १६३ जागा जिंकता आल्या. तर बहुमताची अपेक्षा करणाऱ्या उजव्या विचारसरणीच्या आरएन आघाडीला १४३ जागा मिळवता आल्या. मॅक्रान आणि डाव्यांच्या या राजकीय खेळीने फ्रान्समध्ये आरएन या उजव्या आघाडीला सत्तेपासून दूर राहावं लागलं असलं तरी, हे खूप दिवस चालणार नाही.
 
एकेकाळी डाव्यांचा गड असलेल्या फ्रान्समध्ये उजवी विचारसरणी सर्वमान्य होत आहे. डाव्यांच्या आणि उदारमतवाद्यांनी बेकायदेशीर घुसखोरांबद्दल घेतलेल्या बोटचेपी धोरणामुळे आज फ्रान्स युरोपातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेला देश बनला आहे. फ्रान्समध्ये धार्मिक कट्टरतावाद वाढत आहे. त्यामुळे फ्रान्सच्या मूल्य आधारित राजकीय व्यवस्थेला आणि संस्कृतीला धोका निर्माण झालाय. पण, मानवाधिकारांच्या नावाखाली डावे या घुसखोरांचे स्वागत करत आहेत. याचं घुसखोरांच्या विरोधात मरिन ले पेन यांच्या पक्षाने भूमिका घेतली होती. पण, मॅक्रॉन आणि डाव्यांच्या कुटील राजकीय डावपेचांमुळे त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं. पण, फ्रान्समध्ये डाव्यांचा विजय होताचं. त्यांना विजयाचा उन्मादही आला. त्यांचे समर्थक रस्त्यावर येऊन हिंसाचार करत आहेत. फ्रान्समधील जवळपास सर्वच शहरात आगतांडव सुरू आहे. या हिंसाचारात डाव्यांचा आणि विशेषता त्यांच्या बेकायदेशीर घुसखोर असलेल्या समर्थकांचा हात असल्याचा आरोप होत आहे. एकेकाळी जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता देणारा फ्रान्स आज यावेळी अराजकतेचा पर्यायवाचक शब्द बनलाय, हे दुर्दैव...