“हिंदू देवांमध्ये शक्ती नाही, तू कुराण वाचत जा”; शिकवण्याच्या नावाखाली रिझवान करत होता लहान मुलांचे ब्रेनवॉशिंग

    08-Jul-2024
Total Views |
 teacher
 
 
नवी दिल्ली : नवी दिल्लीतील शकूरपूर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे रिझवान नावाचा शिक्षक जेएमडी कोचिंग सेंटरमध्ये हिंदू विद्यार्थ्यांचे ब्रेनवॉश करत असल्याचे समोर आले आहे. तो त्यांना देवाची पूजा सोडून अल्लाची पूजा करण्यास सांगत होता. आता कोचिंगमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या वडिलांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
मुलाच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, जेव्हा त्यांनी त्यांच्या मुलाला कोचिंग सेंटरमध्ये दाखल केले तेव्हा ते संजयला भेटले होते. नंतर आम्हाला कळलं की रिझवान, अबरार आणि इरफान तिथे शिकवतात. समोर आलेल्या तक्रार पत्रानुसार, वडिलांनी सुभाष पॅलेस पोलिस स्टेशन गाठले आणि तक्रार दिली की त्यांचे मूल जेएमडी कोचिंगमध्ये शिकते आणि गेल्या अनेक दिवसांपासून ते त्यांना कुराणबद्दल विचारायचे. सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केले पण नंतर मुलाने सांगितले की कोचिंग क्लासमध्ये शिकवणारे शिक्षक रिजवान त्याला वारंवार कुराण वाचण्यास सांगत होते आणि कलमा वाचण्यासाठी वारंवार दबाव आणत होते.
याशिवाय, समोर आलेल्या तक्रारीनुसार, असे देखील नमूद केले आहे की शिक्षकांनी मुलांना सांगितले – “तुमचा हिंदू धर्म मूर्खपणाचा आहे. तुमच्या देवी-देवतांमध्ये शक्ती नाही. त्यामुळे आतापासून कुराण आणि कलमा वाचावे लागतील. त्यात खूप शक्ती आहे. अशा प्रकारे तुम्ही बलवान व्हाल.”
मुलाच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आणि कोचिंग सेंटरमध्ये जाऊन तेथील एका मॅडमशी बोलले तेव्हा मॅडमने त्यांनी रिजवानशी भेट घालून दिली. मुलाच्या वडिलांनी रिझवानला विचारले, तू मुलावर जबरदस्ती का करतोस? याचा राग येऊन रिझवानने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तक्रारीत म्हटले आहे की, रिझवानने मुलाच्या वडिलांना सांगितले - मी दाऊद इब्राहिमचा पिता आहे. मी तुझ्या संपूर्ण कुटुंबाला नग्न करीन.
याप्रकरणी स्वराज्याच्या ज्येष्ठ पत्रकार स्वाती गोयल शर्मा यांनी तक्रार पत्र शेअर करताना काही ट्विट केले आहेत. स्वाती गोयल शर्मा म्हणाल्या, “मी मुलांच्या वडिलांशी बोलले आणि सत्य हे आहे की ज्या कोचिंग सेंटरमध्ये अल्पवयीन हिंदू मुलांचे इस्लाममध्ये धर्मांतर केले जात आहे त्याचे नाव 'जय माता दी' आहे आणि त्याच्या बोर्डवर JMD लिहिले आहे. मुलाच्या वडिलांचे म्हणणे आहे की, जेव्हा त्यांनी मुलांना प्रवेश दिला तेव्हा त्यांचे संजय नावाच्या व्यक्तीशी बोलणे झाले. रिजवान आणि अबरार सारखे शिक्षक शिकवणीला येतील आणि मुलांना धर्मांतर करण्यास भाग पाडतील हे त्या वेळी वडिलांना माहित नव्हते.
या प्रकरणी पीडित मुलाची प्रतिक्रिया सुद्धा माध्यमांमध्ये समोर आली आहे. जनमत की पुकार नावाच्या चॅनलवर हे मूल स्पष्टपणे म्हणताना दिसत आहे – “रिझवान सर म्हणायचे की तुमच्या हिंदू देवदेवतांमध्ये शक्ती नाही. आमच्या अल्लाहमध्ये आहे. ” पालक आपल्या मुलांना ब्रेनवॉशिंगसाठी नाही तर कोचिंगमध्ये शिक्षणासाठी पाठवतात, असे वडील सांगताना दिसतात. ते म्हणाले की, या लोकांची मानसिकता अशी आहे की ते शिक्षक होऊ शकत नाहीत. त्यांना जिहादी म्हटले तर बरे होईल. हे काम शिक्षकांचे नाही. हे शिक्षक नाहीत, लोकांचे धर्मांतर करत आहेत. कोणत्याही धर्मावर भाष्य करायचे नाही, पण मुलांना शिक्षणासाठी पाठवताना त्यांचे ब्रेनवॉश का केले जात आहे, असे ते म्हणाले.