मुख्यमंत्र्यांना तुरुंगात घ्यायच्यात अतिरिक्त बैठका; न्यायालयाच्या भूमिकेकडे लक्ष!
07-Jul-2024
Total Views |
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आप नेते अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत वकिलांशी दोन अतिरिक्त बैठका घेण्याबाबत लवकरच न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान, तिहार तुरुंग प्रशासनाला निर्देश देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर दि. ०८ जुलै रोजी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
दरम्यान, या प्रकरणातील सर्व आरोपींच्या भूमिकेची चौकशी करण्यात आली असून केवळ मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या भूमिकेची चौकशी सुरू आहे, असे विशेष सरकारी वकील कावेरी बावेजा यांनी सांगितले. अरविंद केजरीवाल यांना दि. २१ मार्च रोजी मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोर्टाने २१ दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यानंतर पुन्हा ०२ जून रोजी आत्मसमर्पण केले.