अहमदाबादमध्ये राहुल गांधींविरोधात बजरंग दलाची निदर्शने, पोलिसांनी घेतले ताब्यात!
07-Jul-2024
Total Views |
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत हिंदूविरोधी केलेल्या वक्तव्याविरोधात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अहमदाबाद येथे निदर्शने केली आहेत. निदर्शनादरम्यान, बजरंग दलाच्या सदस्यांनी राहुल गांधी यांच्या हिंदू समुदायावर केलेल्या टिप्पणीवरून त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर गुजरात पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
दरमयान, संसदेतील हिंदूविरोधी वक्तव्याचा निषेध करणाऱ्या बजरंग दलाच्या सदस्यांना अहमदाबादमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी जय श्री रामचा नारा देत राहुल गांधींच्या पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखून ताब्यात घेतले आहे.
या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सहआयुक्त नीरज बडगुजर यांनी सांगितले की, बजरंग दलाच्या सदस्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचबरोबर, शांतता राखण्यासाठी आवश्यक फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या परिसरात शांतता असून बजरंग दलाचे कार्यकर्ते निषेधार्थ बाहेर आले होते परंतु त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे,” सहआयुक्त यांनी एएनआयला सांगितले.