देशातील फार्मास्युटिकल मार्केटने घेतली भरारी; जूनमध्ये ८ टक्क्यांची वाढ!

    07-Jul-2024
Total Views |
Pharmaceutical sector market


नवी दिल्ली :        देशातील फार्मास्युटिकल मार्केटने जूनमध्ये भरारी घेतली आहे. फार्मास्युटिकल क्षेत्राने तब्बल ८ टक्क्याने वाढ नोंदवत सकारात्मक मूल्यवर्धन दिसून आले आहे. दरम्यान, जीएसके अँटीबायोटिक औषध ऑगिमेंटिन आणि युएसव्ही अँटी-डायबेटिक औषध जून २०२४ मध्ये अनुक्रमे ७६ कोटी आणि ६६ कोटी रुपयांच्या विक्रीसह सर्वाधिक मोठा औषध ब्रँड राहिला आहे.

दरम्यान, भारतीय फार्मास्युटिकल मार्केट जून २०२४ मध्ये ८.८ टक्के वाढले असून सर्व प्रमुख थेरपी क्षेत्रांमुळे सकारात्मक मूल्य वाढ दिसून आली, असे मार्केट रिसर्च फर्म फार्मरॅकने म्हटले आहे. अग्रगण्य थेरपींपैकी, श्वसन (१९.२ टक्के), अँटी-इन्फेक्टीव्ह (१७.२ टक्के), आणि अँटी-इन्फेक्टीव्ह (१०.७ टक्के) थेरपी क्षेत्रांमध्ये जून २०२४ मध्ये दुहेरी अंकी मूल्य वाढ झाली आहे.

विशिष्ट थेरपी क्षेत्रांच्या मूल्यात वाढ होण्यामागील कारणाविषयी बोलताना, फार्मरॅकच्या उपाध्यक्ष (व्यावसायिक) शीतल सापळे यांनी सांगितले की, बहुसंख्य थेरपी क्षेत्रांमध्ये सकारात्मक मूल्य वाढ दिसून आली आहे. परंतु, विशिष्ट उपचारांमध्ये सामान्यतः हंगामी वाढ दिसून येते. वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत, जूनपासून उच्च विकास दर दर्शविण्यास सुरुवात झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.