अनंत-राधिकाच्या लग्नात रणवीर-सलमानच्या परफॉर्मन्सने वाढली रंगत

    06-Jul-2024
Total Views |

salman khan 
 
 
 
मुंबई : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्याला ५ जुलैला संपुर्ण बॉलिवूड इंडस्ट्री अवतरली होती. यामध्ये सलमान खान, रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, जान्हवी कपूर, विकी कौशल, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांसारख्या अनेक सेलिब्रेटींचा समावेश होता. सोशल मीडियावर सध्या या संगीत कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले असून यापैकी एका व्हिडिओत सलमान खान आणि रणवीर सिंग अनंत अंबानी सोबत डान्स करताना पाहायला मिळत आहेत.
 
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सलमान खान अनंतसोबत स्टेजवर आनंदाने डान्स करताना दिसत आहे. दोघेही सलमानच्याच चित्रपटातील 'ऐसा पहली बार हुआ है' गाण्यावर थिरकत आहेत. याशिवाय, अभिनेता रणवीर सिंग यानेही
सलमानच्याच 'नो एंट्री'च्या टायटल साँगवर डान्स केला. विशेष म्हणजे मॉम टू बी दीपिका पडूकोण हिने देखील या सोहळ्याला आवर्जून हजेरी लावली होती.
 

salman khan 
 
अनंत आणि राधिकाचा संगीत सोहळा बीकेसी येथील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) येथे संपन्न झाला. तर हे दोघेही १२ जूलै रोजी विवाह बंधनात अडकणार आहेत. त्यानंतर शनिवार, १३ जुलै रोजी शुभ आशिर्वादाचा कार्यक्रम आणि लग्नाचे रिसेप्शन रविवार, १४ जुलै रोजी होणार आहे.