केंद्रीय अर्थसंकल्प 'या' दिवशी होणार सादर!

    06-Jul-2024
Total Views |
central budget will be present


नवी दिल्ली :   
   केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण लवकरच अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दि. २३ जुलै रोजी अर्थमंत्री सीतारामण केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत मांडणार आहेत. मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा रोडमॅप ठरणाऱ्या अर्थसंकल्प लवकरच मांडण्यात येणार आहे. विशेष म्हणजे अनिश्चित कालावधीकरिता स्थगिती करण्यात आलेले अधिवेशन दि. २२ जुलैपासून सुरू होणार आहे.

दरम्यान, फेब्रुवारीमध्ये अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्प एप्रिल आणि मेमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमुळे निकालानंतर १८व्या लोकसभेत तो मांडण्यात येणार होता. त्यानंतर आता केंद्रीय अर्थमंत्री सीतारामण लवकरच बजेट सादर करतील. तसेच, राष्ट्रपतींनी केलेल्या अभिभाषणात अर्थसंकल्पाबाबत मोठ्या अपेक्षा व्यक्त करण्यात आल्याचेही पाहायला मिळाले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारने तिसऱ्या कार्यकाळात सादर केलेला हा पहिला अर्थसंकल्प असणार आहे. सीतारामन यांनी सादर केलेल्या शेवटच्या अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्री सीतारामन यांनी आर्थिक वर्ष २५ साठी वित्तीय तूट जीडीपीच्या ५.१ टक्के ठेवली होती. सरकारने भांडवली खर्चावर आपले लक्ष केंद्रित केले होते, यावेळी ते १६.९ टक्क्यांनी वाढवून ११.११ लाख कोटी रुपये केल्याचे स्पष्ट केले होते.