"माझा बालमित्र लक्षाची खूप आठवण आली...", निवेदिता सराफ यांनी अभिनय बेर्डेचं केलं कौतुक

    06-Jul-2024
Total Views |

nivedita Saraf 
 
 
मुंबई : मराठी चित्रपटांचा विषय निघाला की लक्ष्मीकांत बेर्डे यांचं नाव येणार नाही असं होणारच नाही. त्यांच्या निधनामे त्यांची पोकळी तर भरु शकत नाही पण त्यांच्या अभिनयाचा वारसा त्यांचा मुलगा अभिनय बेर्डे नक्कीच पुढे नेत आहे. सध्या रंगभूमीवर आज्जीबाई जोरात हे त्याचं पहिलं नाटक जोरदार गाजत असून अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी त्याचं विशेष कौतुक केलं आहे.
 
निवेदिता सराफ यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत अनेक चित्रपट गाजवले. निवेदिता आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे बालपणीचे मित्र. आणि आता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेचं आज्जीबाई जोरात हे नाटक निवेदिता सराफ यांनी पाहिले आणि त्यांना लक्ष्याची आठवण आली. या नाटकाच्या निमित्ताने अभिनयचं कौतुक करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
निवेदिता सराफ यांनी इंस्टाग्रामवर अभिनय बेर्डे सोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, “नुकताच आज्जीबाई जोरात हे नाटक बघायचा योग आला. नाटक खूप छान आहे. निर्मिती सावंत, पुष्कर श्रोत्री, जयवंत वाडकर या सगळ्यांनी खूप छान कामं केली आहेत. लेखक-दिग्दर्शक क्षितीज पटवर्धनचं खूप कौतुक. पण सगळ्यात सुखद धक्का बसला अभिनय बेर्डेचं काम बघून. अप्रतिम काम केलंय. त्याने माझ्या बालमित्राची आमच्या लक्षाची खूप आठवण आली. त्याला खूप अभिमान वाटला असता नक्कीच”.
 
 

nivedita Saraf