खारमधील निर्मल नगरमध्ये एलपीजी सिलेंडरचा स्फोट!

एक जखमी, पालिकेकडून घटनेची माहिती

    06-Jul-2024
Total Views |
Mumbai Cylinder Blast

मुंबई : मुंबईतील खार परिसरात निर्मल नगर येथे बांधकाम कामगारांसाठी बांधलेल्या झोपड्यांना एलपीजी सिलेंडरच्या स्फोटामुळे दि. ६ जुलै रोजी आग लागली आहे. या अपघातात एक जण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी व्ही.एन.देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली. दरम्यान सीएमओ डॉ. विवेक जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबधित व्यक्तिवर प्राथमिक उपचार करून त्याला कस्तुरबा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

दरम्यान महिनाभरापूर्वी चेंबूर परिसरात एलपीजी सिलेंडरचा स्फोट झाला होता. या अपघातात ९ जण जखमी झाले होते. तसेच चेंबूरच्या सिद्धार्थनगर येथील जैन मंदिरासमोरील चाळीत सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली होती. त्या स्फोटात ही एक जण गंभीर भाजला होता. एप्रिलमध्ये, मालाडमधील आठ मजली इमारतीच्या मीटर केबिनमध्ये आग लागल्याने घाबरून त्यांच्या फ्लॅटमधून बाहेर पडताना एका लहान मुल आणि काही ज्येष्ठ नागरिकांसह १४ जण आगीत जखमी झाले होते.