उबाठा गटाचे माजी नगरसेवक शिवसेनेत

    06-Jul-2024
Total Views |

ubatha
 
मुंबई : नवी मुंबई येथील ऐरोली विभागातील उबाठा गटाचे माजी नगरसेवक मनोज हळदणकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शुक्रवार, दि. ५ जुलै रोजी रात्री शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न झाला.
 
शिवसेनेचे नवी मुंबई महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी हळदणकर आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हळदणकर यांचा पक्षप्रवेश म्हणजे नवी मुंबईत उबाठा गटाला मोठा धक्का मानला जात आहे. यावेळी खासदार नरेश म्हस्के हेदेखील उपस्थित होते.